धुळे । मध्यप्रदेश सरकारने हुकूमशाही पद्धतीने 27 जुलै रोजी बडवानी येथील राजघाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी व महादेवभाई यांची समाधी उखडून टाकली. या घटनेच्या निषेधार्थ व मेधा पाटकरांच्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आज गांधी पुतळा चौकात एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुनर्वसन धोरण, न्यायालयाचे आदेश, न्यायाधिकरणाचा निवाडा ही प्रक्रिया पूर्ण करावी, धरण ग्रस्तांची मालमत्ता पुनर्वसनाशिवाय बुडवू नर्मदा बचावतर्फे लाक्षणिक उपोषण नये.
या संघटनांनी घेतला सहभाग
या उपोषणात भूमीहिन, मच्छिमार, कुंभार, छोटे व्यापारी, उद्योजक यांचे पुनर्वसन करावे, यामागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. यावेळी राष्ट्रसेवादल, नर्मदा बचाव आंदेलनाचा गट, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सर्वोदय मंडळाचे शरद कांबळे, प्रा.शाम पाटील, हिरालाल सापे, गो.पी.लांडगे, कॉ. राहूल वाघ, कॉ.सिद्धार्थ जगदेव, प्रा.अनिल सोनार आदी उपस्थित होते.