जळगाव | जवाब दो…विवेकाचा आवाज बुलंद करू या…डॉ.दाभोलकर आपले विचार अमर आहेत…अशा विविध घोषणा देत शहरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने निर्भय मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली. पदमश्री शहिद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 5 वर्षे झाली तरी खुनी मोकाट असल्याच्या निषेधार्थ ही रॅली निघाली.
शिवतीर्थ मैदान ते काव्यरत्नावली चौक दरम्यान ही रॅली निघाली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज ५ वर्षे पूर्ण झालीत. तसेच कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४२ महिने झालीत. मात्र त्यांच्या हत्येचे सूत्रधार अद्यापही मोकाट आहेत. याबाबत तपास यंत्रणेने सनातन संस्थेच्या साधकांना अटक केली असूनही सूत्रधार कोण हे निष्पन्न झालेले नाहीत.
रॅलीत जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, बुवाबाजी विभागाचे ऍड. भरत गुजर, सांगली येथील भास्कर सदाकळे, महेश सदाकळे, सागर फाळके, राजेश सोक्ते, आर. एस.चौधरी, विश्वजीत चौधरी, शहर कार्याध्यक्ष पियुष तोडकर, पंकज पवार, विकास मोरे, विकास वाघ, विशाल बोदडे, मिनाक्षी चौधरी, प्रसाद तायडे, अमोल गोमटे, अजय मनुरे, रोहित शिंपी, प्रीतम वळवी, ओम मिटकरी, वैशाली झालटे, राजेश पवार, आकाश चौधरी, हेमंत सोनवणे, शिरीष चौधरी आदीनी सहभाग घेतला.