अंनिसतर्फे सापांविषयी केले प्रबोधन

0

शहादा । वडछिल ता. शहादा येथे अंनिसच्या वतीने वड़छील च्या इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये सापांविषयी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मुलन समिती शहादा शाखेच्यावतीने द्रोणागिरी इंग्लिश पब्लिक स्कूल, वडछील येथे सापांविषयी प्रबोधन करण्यात आले. यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्या भारती पवार यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर्सद्वारे सापांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. यात बिनविषारी, सौम्यविषारी आणि विषारी सापांविषयी माहिती देत अंधश्रध्दा व गैरसमज दूर केले. व्यक्तीला सापांचा दंश झाल्यावर डॉक्टरांकडे घेवून जाण्याचा सल्ला दिला.