अंनिसतर्फे 25 जुलै रोजी उत्तम कांबळे यांचे व्याख्यान

0

जळगाव । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 25 जुलै रोजी विचारवंत उत्तम कांबळे यांचे जाहीर व्याख्यान आणि नाशिकच्या कृष्णा चांदगुडे यांच्या अनुभव कथनाचे आयोजन करण्यात आले आहे. व.वा.वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. महाराष्ट्र अंनिसने शासनाकडून सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा हा दुसरा कायदा पारित करून घेतला आहे. अंनिसचे जात पंचायतीला मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे हे त्यांना आलेले अनुभव सांगणार असून अंनिसच्या जिल्हा व शहर शाखेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे. उत्तम कांबळे हे सामाजिक बहिष्कार कायद्याविषयी बोलतील. अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील असून प्रमुख उपस्थिती राज्य पदाधिकारी डॉ.प्रदीप जोशी, जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, शहराध्यक्ष डॉ.अजय शास्त्री यांची आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, शहर कार्याध्यक्ष हेमंत सोनवणे, सचिव पियुष तोडकर, कायदे विभागाचे अ‍ॅड. भरत गुजर यांनी केले आहे.

डॉ. आंबेडकर विचार संमेलनासाठी बैठक
जळगाव-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा महिला असोसिएशन आणि इतर समविचारी संस्थांच्या वतीने शहरात 24 सप्टेबरला डॉ.आंबेडकर विचार संमेलन होत आहे. त्याकरिता समविचारी नागरिक व संस्थांची द्वितीय बैठक 25 जुलै रोजी आयोजित आहे.पत्रकार भवनात दुपारी 3 वाजता आयोजित बैठकीला प्रमुख उपस्थिती विचारवंत व लेखक उत्तम कांबळे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची आहे. संमेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी यावेळी चर्चा होईल. समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शहर कार्याध्यक्ष हेमंत सोनवणे, महिला असो. अध्यक्षा राजकमल पाटील यांनी आवाहन केले आहे.