अंनिस जिल्हा कार्यकत्यांचा संकल्प मेळावा

0

जळगाव। अंधश्रद्धा निर्मृलनाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव सर्वच पातळीवर होत असून अंधश्रद्धा निर्मुलनाचा विचार हा मानव विकासाचा, मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये काम करायचे म्हणून त्याकडे सवार्ंनी बघितले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष तथा ‘फिरा’ या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

दारु दुकान बंदीविरोधात सक्रीयांचा निषेध
अविनाश पाटील यांनी बैलगाडी शर्यतीला राज्य शासनाने मंजूरी दिली असून हे आधुनिक माणसांचे लक्षण नसून हा लोकानुयन असल्याचे सांगितले. तसेच बैलगाडींच्या शर्यतीची आनंद विकृत मानसिकेतचे लक्षण असल्याचे सांगितले. या शर्यतींना पेटा संघटनेने विरोध केला असून त्याला अनिसचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. सुप्रिम कोर्टाने हायवेलगत 500 मीटर आतील दारू दुकांनावर बंदी आणलेली असतांना दारू विके्रते व राजकीय यंत्रणा पळवाट शोधत आहेत. या प्रवृत्तीचा अनिसने निषेध केला आहे. व या विरोधात 7 मे रोजी राज्यस्तरीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जात पंचायत विरोधी कायदा 2013 साली लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून 300 पेक्षाजास्त गुन्हे दाखल झालेले असतांना केवळ 6 जणांना शिक्षा झाली असल्याने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारी यंत्रणांना प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2017 हे वर्ष नैराश्य विरोधी वर्ष जाहीर केले आहे. यात अनिस सक्रीय सहभाग घेवून समाजमन तयार करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

शाखानिहाय अहवाल सादर
ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी जिल्हा संकल्प मेळावा नुतन मराठा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला निरीक्षक म्हणून डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप जोशी, प्राचार्य एल.पी. देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कट्यारे आदी उपस्थित होते. जिल्ह्याभरातून आलेल्या सदस्यांनी शाखानिहाय अहवाल यावेळी सादर केला. यात शाखांद्वारे घेण्यात आलेल्या रचनात्माक, संघर्षात्मक कार्य यांचा आढाव घेण्यात आला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनसाठी केलेले कार्य, त्यांनी राबविलेले उपक्रम याबाबत अहवाल सादर केला. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता बोलून दाखविली. जिल्ह्यांत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम जोमाने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन विषयक प्रयोग व व्याख्यान तसेच प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी अनिसच्या कार्यकर्त्यांना बोलविण्यात येवून तरूणांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले.