अंबरनाथमध्ये छोट्या पुलामध्ये दिलासा

0

अंबरनाथ : येथील पश्चिम भागांमधील विमको नाकाजवळील गावमंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावर सुमारे 20 लाख रुपये खर्च करून एक छोटा पूल बांधला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

न्यू कॉलोनी कोहोज-खुंटवली, चिंचपाडा, मातोश्रीनगर, विमको कॉलनीमध्ये राहणार्या असंख्य नागरिकांना होणारा त्रास येथील काँग्रेसचे नगरसेवक विलास जोशी यांनी नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. गेल्या 22 वर्षांपासून रखडलेल्या सदर पुलाचे बांधकाम आज मार्गी लावले आहे. तेव्हा अंबरनाथ शहरवासींयातर्फे नगरसेवक विलास जोशी यांचे काँग्रेसचे गटनेता प्रदीप पाटील यांनी जाहीर आभार मानले.