अंबरनाथ । अंबरनाथ स्थानकात शनिवारी दुपारी 2.37 वाजताच्या सुमारास पेंटा ग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेत 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होणारी गाडी अंबरनाथ स्थानकात येताच पेंटग्राफ तुटल्याची घटना घडली. या घटनेत कमलेश (45), जनार्दन थाट (32) आणि विनय बाबासाहेब बडेकर (17) हे तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
सीएसटीएमकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. कमलेश यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना अंबरनाथ येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर दोन प्रवाशांना कल्याण रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवासी सचिन यांच्या नाकाला तर बडेकर यांच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी सांगितले.