अंबरनाथमध्ये विद्यार्थीनीवर ६ जणांचा सामुहीक अत्याचार : ४ जणांवर झडप

0

उल्हासनगर: नुकतेच ९ वीच्या परिक्षा पास होऊन १० वीत गेलेल्या विद्यार्थीनीचा शाळेजवळून अपहरण करण्यात आले होते. त्या विद्यार्थीनीला २ दिवस कोंडून ठेवून तिला बियर पाजून ६ जणांनी सामुहीक अत्याचार केल्याचा खळबजनक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार अंबरनाथमध्ये राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीने नुकतीच ९ वीची परिक्षा पास होऊन ती दहावीत गेली होती. शाळेला सुट्टया लागल्याने त्यात १० वीचे व्याकेशन क्लासेस शाळेत सुरू असल्यामुळे तिला तिच्या आजोबांनी सकाळी पाहुणे ८ च्या सुमारास सोडले होते. त्याठिकाणाहून ती बेपत्ता झाल्याने अंबरनाथ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २ दिवस ती मुलगी बेपत्ता असल्याने पोलिस व तिचे आईवडिल तिचा सर्वत्र शोध घेत होते. अखेर ती मुलगी मिळून आल्याने पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या चौकशीतून तिच्यावर ६ जणांनी सामुहीक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या मुलीला शाळेजवळून एका तरूणाने फुस लावून एका ठिकाणी नेले. त्याठिकाणी तिला एका खोलीमध्ये बंदिस्त ठेवण्यात आले. पहिल्या दिवशी तिला जबरदस्तीने बियर पाजून ५ जणांनी तिच्यावर सामुहीक अत्याचार केला. त्यानंतर दुस-यादिवशी आणखीन एकाने अत्याचार केला. अशी माहिती अंबरनाथ पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी अंबरनाथ परिसरातून विविध ठिकाणाहून नितीन(२१), कुशाल(२५), दिलीप उर्फ मुकेश(२६), गोविंद(२१) या ४ जणांना झडप घालून अटक केली. व त्यांचे २ सहकारी फरार झाले आहेत. याप्रकरणी ६ जणांविरूध्द अंबरनाथ पोलिस ठाण्यात कलम ३६३, ३७६(२)(आय)(एन),३७६(ड),३४ सह फोक्सा, ४, ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या ४ जणांना न्यायालयात हाजर केले असता २७ एप्रिलपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास अंबरनाथ पोलिस करीत आहेत. अंबरनाथमधील अल्पवयीन विद्यार्थीनीवर ६ जणांनी सामुहीक अत्याचार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहेत.