अंबरनाथला इलेक्ट्रॉनिक पेन हुक्क्याचा विळखा

0

अंबरनाथ । अंबरनाथमधील शाळा आणि कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसराला इलेक्ट्रॉनिक हुक्क्याचा विळखा पडला आहे. सहज उपलब्ध होत असलेला हा इलेक्ट्रॉनिक हुक्का अगदी पेन सारखा दिसत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही खिशात पेन ठेवला असल्याचे दाखवत मैदानात,रस्त्यावर,स्कायवॉकवर, चालताना सहजपणे नशा करत असल्याचे चित्र अंबरनाथमध्ये पहायला मिळत आहे. असे हुक्का व उपकरणे विकणार्‍या दुकानदारांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी अंबरनाथकरांनी केली आहे.

अंबरनाथ शहरामध्ये शाळा, कॉलेजच्या अगदी बाजूला असणार्‍या दुकानांमध्ये अवैधरीत्या इलेक्ट्रॉनिक हुक्का आणि चार्जर 400 रुपये तर रिफिल 100 रुपयाला अशा पद्धतीने विक्री होत आहे. त्यामुळे शाळा प्रशासन, पालकांनी गांभीर्याने या प्रकरणाची दखल घेऊन आपल्या मुलाच्या दप्तराची तपासणी करून इलेक्ट्रॉनिक हुक्का असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची खबर तातडीने पोलिसांना द्यावी असेही आवाहन अंबरनाथमधील दक्ष नागरिकांनी केले आहे.