शहादा । गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या पर्वास येथील अंबाजी माता देवीच्या मूर्तीस सोन्याचा मुकुट चढविण्यात आला आहे. दानपेटीत आलेले रोख व सोन्याच्या वस्तूपासून 500 ग्रॅम सोन्याचा मुकुट तयार करण्यात येवून तो देवीला चढविण्यात आला आहे. शहादा शहरात अंबाजी नगर भागात 1994 साली श्री अंबाजी माता देवीच्या भव्य मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली होती. पंचवीस वर्ष मंदिरास पूर्ण झालेले आहे. मंदिरात येणारे भाविक हे रोख व दागिन्यांच्या स्वरुपात दान करीत आहे. सुमारे 500 ग्रँमचे सोन्याचे दोन मुकुट तयार होईल एवढे रोख व दागिने होते. संस्थेचे विश्वस्त विनयचंद्र गांधी, रमेशचंद्र चोरडिया, पारसकुमार देसर्ड, विजय भावसार, सुभाष बागुल यांनी आज गुडीपाडवा नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी मातेच्या मूर्तीस व श्री गणेश मूर्तीस सोन्याचे मुकुट परिधान केले.
मूर्तीच्या मुकुटाची काढली मिरवणूक
मंदिराचे विश्वस्त विनयचंद्र गांधी व मीना गांधी यांनी विधिवत पूजन केले. यावेळी डॉ. विलास पटेल, अर्जुन सोनी, अमरचंद चोरडिया, हेमल गांधी, समीर चोरडिया, भरत ओस्तवाल, मयूर जैन, दिलीप जैन, अरुण मराठे, बनेचंद जैन, ऋषभ गेलडा, निलेश कोटडीया, रुपेश कोटडीया, मनोहर जैन, विनय जैन, डॉ. नटवरलाल जाधव, तसेच कल्पना रमेशचंद्र चोरडिया, मीना विनय गांधी, कल्पना पारस देसर्ड, विजया विजय भावसार, हेमलता विलास पटेल, कल्पना मराठे, जयश्री जाधव, सुशीला कोटडीया यासह भाविक उपस्थित होते. शहरातील अंबिका ज्वेलर्स येथून मूर्तीच्या मुकुटाची मिरवणूक काढण्यात आली. अर्जुन सोनी यांनी शुद्ध 500 ग्रँम सोन्याचे दोन मुकुट तयार केले आहे. मंदिरात येणार्या भाविकांनी श्रद्धेने केलेल्या रोख रक्कम व सोन्याच्या दागिने एकत्र करून हे दोन मुकुट तयार केले आहेत. मंदिरात नवरात्री तसेच इतर वेळेस अनेक भक्तांनी केलेल्या मान्यतेची पूर्तता येथे होत असते. संस्थेचे विश्वस्त रमेशचंद्र चोरडिया, विनय गांधी पारसकुमार देसर्ड, विजय भावसार व सुभाष बागुल यासह परिश्रम घेतात.