अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कमी पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक व मानसीक दृष्ट्या त्रस्त झाला आहे.त्यामुळे तात्काळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. सणासुदीच्या काळात सुरू असलेले भारनियमन रद्द करावे. दररोजची वाढती पेट्रोल-डिझेल व घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ रद्द करावी.या सोबतच तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ,विधवा व अपंग लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, ए.पी.एल.,बी.पी.एल.शिधा पत्रिका धारकांना दिवाळी आधी धान्य वाटप करावे यासह आदी विविध मागण्यांची दोन निवेदने अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना दि.20 ऑक्टोंबर रोजी देण्यात आले.
माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित चाचा लोमटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अंबाजोगाई यांना वरील मागण्यांचे दोन निवेदने देण्यात आली. सदरील निवेदनावर माजी आ.पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, नगर पालिका येथील पाणी पुरवठा सभापती बबन भैया लोमटे, नगरसेवक अशोक मोदी, मिलिंद बाबजे, शेख अनिसोद्दीन, दत्ता सरवदे, कैलास गायवाकड, यांच्यासह असंख्य जणांच्या स्वाक्षर्या आहेत.