अंबानींनी थकविले कर्ज; बँकेने दिली नोटीस

0

मुंबई: जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान असलेल्या अंबानींना देखील बँकेने कर्ज थकविल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहे. खासगी क्षेत्रातील बँक ‘येस बँके’नं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठविले आहे. मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचे १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला बँकेने २ हजार ८९२ कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. याव्यतिरिक्त बँकेनं रिलायन्सची नागिन महल येथील दोन कार्यालयेही आपल्या अधिकारांतर्गत घेतली आहे. डिफॉल्टर्सचे असेट्स आपल्या ताब्यात घेत त्याची विक्री करण्याचा अधिकार बँकांना आहे. कारवाईपूर्वी नोटीस