अखंड भारत दिनानिम्त्ति रावेर शहरात रक्तदान शिबिर
रावेर- आपण केलेले रक्तदान दुसर्यांसाठी जीवदान ठरते. अंबिका व्यायाम शाळेत मागील अनेक वर्षापासून असे सामाजिक कार्य करत आहे यापुढेही त्यांनी रावेर शहरातील प्रत्येक नागरीकांसाठी वेळेवर धावून त्यांना अत्यावश्यक मदत करत रहावी, असे प्रतिपादन रावेर शिक्षण संवर्धकचे अध्यक्ष प्रकाश मुजूमदार यांनी येथे केले. अखंड भारतदिनानिमित्त अंबिका व्यायाम शाळेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रकाश मुजूमदार बोलत होते.
यांची होती उपस्थिती
माधवराव गोळवलकर रक्त पेढीमार्फत रक्त संकलन करण्याचे काम सुरू झाले असून या कार्यक्रमाला जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनराध्यक्ष अॅड.सुरज चौधरी, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, माजी नगराध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलशेट अग्रवाल, हरीश गनवानी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रावेर शिक्षक संवर्धकचे अध्यक्ष प्रकाश मुजूमदार, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, नगरसेविका संगीता महाजन, शारदा चौधरी, श्रीरामशेट अग्रवाल, भाजपा माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भास्कर पहेलवान, नगरसेवक आशा मेंबर, मुन्ना अग्रवाल, भाजपा सरचिटणीस वासु नरवाडे, सी.एस.पाटील, वैद्यकीय अधिकारी बी.बी.बारेला, अॅड लक्ष्मीकांत शिंदे, शिरीष वाणी, पप्पूशेट गिनोत्रा, भाजपा शहराध्यक्ष श्रावगे, गयास शेख, विठ्ठल पाटील, अय्यूब मेंबर, शैलेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल, डी.डी.वाणी, प्रकाश पाटील, प्रदीप मिसर, युवराज महाजन यांच्या सह अंबिका व्यायाम शाळेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.