अंर्तुली दंगलीतील दोघा आरोपींना अटक

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील अंर्तुली येथे 2018 मध्ये झालेल्या दंगल प्रकरणी दोघा आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये अंर्तुली येथे दंग उसळली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी संजय दयाराम शिरतुरे व अमोल फकिरा शिरतुरे हे तेव्हापासून पसार होते. मुक्ताईनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली व कोठडीत रवानगी केली आहे.