अकरावीसाठी पुणे, पिंपरी, चिंचवडमधील 285 महाविद्यालयांमध्ये 96 हजार 320 जागा

0

पुणे । अकरावी प्रवेशासाठी कोणत्या शाखेसाठी किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्रीय प्रवेश समितीने अखेर गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. असून पुणे व पिंपरी चिंचवडमधील 285 महाविद्यालयांमध्ये एकूण 96 हजार 320 जागा उपलब्ध असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी एकूण 91 हजार 670 जागा उपलब्ध होत्या. प्रवेशासाठी हीींिीं:/र्/िीपश.11ींहरवाळीीळेप.पशीं/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सांगण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशासाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी नेमके काय करावे, कोणत्या मार्गदर्शन केंद्रांना भेट द्यावी, माहितीपुस्तिका कुठून घ्यावी याची माहितीच जाहीर न केल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. मात्र अखेर समितीने संकेतस्थळ तसेच अन्य माहितीही जाहीर केली आहे. त्यानुसार बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर याबाबची सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षीपासून अकरावी समितीने कला व सांस्कृतिक कोट्यांतर्गत दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेतच हे वाढीव गुण मिळत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.

…तर महाविद्यालयांविरुध्द तक्रार करा
. अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने प्रत्येक विनाअनुदानित महाविद्यालयाने किती शुल्क घ्यावे किंवा त्या महाविद्यालयचे शुल्क किती आहे हे माहितीपुस्तिकेत सांगितले आहे. मात्र अनुदानित महाविद्यालयांबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक अनुदानित महाविद्यालयाने 330 ते 390 रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे. पुण्यातील अनुदानित महाविद्यालयांनी 360 रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे. मात्र जी महाविद्यालये यापेक्षा जास्त शुल्क आकारतील त्यांच्याविरोधात आमच्या संघटनेकडे तक्रार करा अशी भूमिका आता सिस्कॉन या संघटनेने घेतली आहे. त्यासाठी कसबा पेठेतील श्रीअनिकेत इमारतीतील निर्मल इंटरप्राइजेस येथील सिस्कॉमच्या कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन संघटनेच्या संचालक वैशाली बाफना यांनी केले आहे. दरम्यान याबाबत पालक व विद्यार्थी शिक्षण विभागाकडेही दाद मागू शकतात.

हेल्प डेस्क सुरू करा
दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया सारखीच असली तरीही विद्यार्थ्यांसाठी मात्र ती दरवर्षी नवी असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्यासाठी हेल्प डेस्क सुरू करावेत, अशा सूचना अकरावी केंद्रीय समितीने केल्या आहेत. हे हेल्पडेस्क सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सुरू ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.

प्रवेश निश्‍चित करत असताना अनेक महाविद्यालये डीडी स्वरुपात शुल्क भरण्याची मागणी करतात. विद्यार्थ्यांचे शुल्क हे ऑनलाईन पध्दतीने किंवा तात्पुरत्या स्वरुपात निश्‍चित करून मग पूर्ण शुल्क भरायला सांगावे, अशाही सूचना समितीने महाविद्यालयांना दिल्या आहेत.