पुणे । अकरावी प्रवेशाच्या सातव्या म्हणजेच दुसर्या विशेष फेरीत 1 हजार 807 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. या फेरीसाठी 2451 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. या फेरीत 644 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने आता अकरावी प्रवेशाची आठवी फेरीही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आतापर्यंत सहा फेर्या घेण्यात आल्या आहेत. या फेरीमध्ये 2 हजार 451 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 1,807 विद्यार्थ्यांना सातव्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांनी 11 सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. यामध्ये 1 हजार 124 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. सर्व प्रकारच्या कोटा प्रवेश रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश पॅनल सुरू राहणार आहे.