अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी

0

पुणे । अकरावीच्या दुसर्‍या फेरीसाठी अर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध असून अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना पुन्हा भरावयाचा आहे. 18 जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा पसंतीक्रम बदलून भरावयचा आहे.

अकरावीच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्याने स्टुडंट लॉगिनमध्ये आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर माय स्टेटस दिसेल. त्यामध्ये क्रमांक चारच्या सेंट्रलायझेशन कोटा चॉईस फिलिंग स्टेटस समोरील फिल्ड यावर विद्यार्थ्यांनी क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपले पूर्वीचेच पसंतीक्रम दिसतील. यात पसंतीक्रमाचा क्रम बदलता येतील. त्यानंतर या पानावरील सेव्ह या बटणावर न विसरता क्लिक करावे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करावे. क्रमांक पाचच्या समोरील क्लिक इअर टू व्हिव अथवा प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म 22 वर क्लिक करावे. दुसर्‍या प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

मार्गदर्शन केंद्रावर अर्ज सादर करा
ज्या विद्यार्थ्यांनी आधीच्या प्रवेश फेरीमध्ये अर्ज केलेला नाही, अशा विद्यार्थ्यार्ंना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी त्यांनी माहिती पुस्तिका घ्यायची आहे. त्यातील सूचनेनुसार अर्ज करणे आवश्यक आहे. कागदपत्रे पडताळणी मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अर्ज सादर करायचे आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली.