अकरावी प्रवेशात दिरंगाई न्यासा संस्थेवर कारवाई

0

मुंबई । अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमध्ये झालेल्या दिरंगाई व त्रुटीबाबत या प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणार्याल न्यासा एशिया प्रायवेट लिमिटेड संस्थेसोबत झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्ती व निविदितेतील तरतुदी विचारात घेऊन संस्थेवर दंडात्मक कारवाईची सुरुवात करण्यात आली आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. राज्यातील 11 वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबईसह सात विभागीय केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुंबई, पुणे येथील विद्यार्थी संख्या मोठया प्रमाणावर आहे. मुंबईत 2 लाख 68 हजार एवढे विद्यार्थी आहेत. त्यामुळे एकाचवेळी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 8 लाख जणांच्या लॉगईन करण्याची क्षमता असणार्यात सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत प्रवेशासाठी 15 लाख लोकांनी लॉगईन केले त्यामुळे या सर्व्हरची क्षमता वाढविण्यासाठी सर्व्हर ट्रासंफर करताना अडचणी उद्भवल्या होत्या. असे ते म्हणाले.