फैजपूर : अकलुद टोल नाक्याजवळील फैजपूर ते भुसावळ रोडवरील किनारा हॉटेल लगत असलेल्या अवैध पत्ता जुगार अड्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांसह सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील, इकबाल सैय्यद, पोलीस नाईक बर्हाटे, विलास झांबरे, कोल्हे, रमण सुरळकर यांनी छापा टाकण्यात आला. यात रोख रक्कमेसह पत्ता जुगाराची साधणे, मोबाईल, मोटारसायकल, रिक्षा असा एकूण 7 लाख 1 हजार 500 रुपये असा माल जप्त करण्यात आलेला आहे.
पिस्तुलसह तीन काडतूस जप्त
जुगार अड्ड्याजवळ शे. इकबाल शे. इब्राहिम (वय 25, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा अंधारात पळत असताना मिळून आल्याने त्यास पकडता त्याच्याकडे 45 हजार रुपये किंमतीचे एक पिस्तुल तीन काडतूस मॅग्झीनमध्ये भरलेले काळ्या रंगाचे त्यावर मेड इन चायना असे नाव कोरलेले पिस्तुल मिळून आल्याने पोलीस नाईक विकास कोल्हे यांनी फिर्याद दिल्यावरुन भारतीय हत्यार अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोले हे करीत असून उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व सहाय्यक पोलीस निरक्षक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील करीत आहे. यातील आरोपीस न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जुगार अड्ड्यावर यांच्यावर केली कारवाई
पोलीसांनी जुगारावर छापा टाकला असता यात सलीमखान तसलिमखान (वय55, रा. जाममोहल्ला), असलम अकबर शेख उर्फ राजू (वय 30, रा. खडका रोड, भुसावळ), शैलेंद्र मनोज बोरसे (वय 30, रा. वाल्मिक नगर, भुसावळ), संजय मुरलीधर मोरे (वय 42, रा. कंडारी), मुकेश ठाकूर (वय 19,रा. जामनेर रोड, भुसावळ), बाळू तुकाराम तायडे (वय45, रा. न्यू. आंबेडकर नगर, भुसावळ), शे.रईस शे. अब्दुल (वय 44, रा. मामाजी टॉकीज, भुसावळ), जमीलखान फिरोजखान (वय 16, रा. जाममोहल्ला, भुसावळ), सै. रईस सै अबुल (वय 40, रा. इमामवाडा, भुसावळ), जावेद छबु तडवी (वय 34, रा. मुस्लीम कॉलनी), नईम रहेमान शेख (वय 33, रा. जाममोहल्ला, भुसावळ), शरीफ अमीर बागवान (वय 49, रा. मामाजी टॉकीज), शुभम दिलीप खत्री (वय 22, रा. 15 बंगला), आकाश पुनमचंद आचरे (वय 22, रा. जाममोहल्ला), संतोष मंगा सावळे (वय 40, रा. सहकार नगर), किशोर रामदास रणसिंगे (वय 36, रा. मामाजी टॉकीज), शे. अरशद शे सबदर (वय 25, रा. जाममोहल्ला), मिर्झा अनवर बेग नुरबेग (वय 42, रा. बत्तीस खोली), नासिर अहमद गुलाम गौस (वय 50, रा. जाममोहल्ला), नविद अहमद नासिर अहमद (वय 15), समीर खान सलीमखान (वय 19, रा. सुरत उमरवाडा), संदीप सुर्यभान दांडगे (वय 36, रा. कंडारी), शेख खालीद शेख बदलु (वय 58, रा. शिवाजी नगर, भुसावळ), रविंद्र बाळकृष्ण जोशी (वय 46, रा. अमरनाथ नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुगार खेळत असलेल्या ठिकाणी घोळात खाली जमिनीवर पत्ता जुगाराची साधे, मोबाईल, मोटारसायकल, रिक्षा असे एकूण 7 लाख 1 हजार 500 रुपये असा माल जप्त करण्यात आलेला आहे. या घटनेबाबत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी तक्रार दिल्यावरुन फैजपूर पोलीस स्टेशनला जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील व सहकारी करीत आहे.