अकाऊंट हॅक करणारा तरूण गजाआड

0
चिंचवड : तरूणीचे इन्स्ट्राग्राम अकाऊंट हॅक करून अश्‍लील फोटो टाकणार्‍या तरूणाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित राजेंद्र पाटील (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरूणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी चिंचवड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून आरोपी चिंचवडमध्ये एका महाविद्यालयात आयटीआय करत आहेत. आरोपी रोहितने तरूणीचे इन्स्ट्राग्राम अकाऊंट हॅक करून त्यावर अश्‍लील फोटो टाकून तरूणीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात येताच तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता 11 सप्टेंबरपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे तपास करत आहेत.