अकारण आपल्या मुलांची दुसर्‍यांच्या मुलांशी तुलना न करण्याचा दिला सल्ला

0

जामनेर – जीवन जगण्याची शाळा ही चार भिंतीत नसून तेथे फक्त विषयांची शाळा शिकविली जाते. आपण आयुष्य जगण्याची पद्धत मुलांच्या जीवनात संकरीत करावी आपण मुलांना समानतेची वागणूक द्यावी, तुम्ही जर मुलांना लहानपणी पाळणाघरात ठेवल तर म्हतारपणी नक्की ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात, असे प्रतिपादन धुळे येथील जयहिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा कर सल्लागार प्रकाश पाठक यांनी नुकतेच पळासखेडे बु॥ येथील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित पालक दिनाच्या कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष राजकुमार कावडिया तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया, शिक्षक विस्तार अधिकारी विश्‍वनाथ काळे, डॉ. सचिन बसेर, शैलेश ललवाणी, विजय सरोदे, केंद्र प्रमुख बालमुकुंद इंधाटे, संजय पाटील आदी उपस्थित होते.

विद्येचे दैवत सरस्वती मातेच्या प्रतिमेस अभिवादन व दिपप्रज्वलन, स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजची मुलं ही आपल्या आई-वडिलांकडे बघून शिकत असतात. त्यांची खरी शाळा ही घरीच असते. आई-वडिल हे त्यांचे महागुरु असतात तर आजी-आजोबा त्यांचे विद्यापीठ असते. काही गोष्टीमध्ये काळामुळे बदल होत असतात, तर काही गोष्टी चिरकाल असतात. त्या कधीही बदलत नाही. शिक्षणाने परिस्थितीबदलत असून आजची मुलं ही गतीने शिकत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मनात विचार करुन त्यांच्याकडून अपेक्षा करावी. अकारण आपल्या मुलांची दुसर्‍यांच्या मुलांशी तुलना करु नये. तुलनेमुळे जीवनात फार मोठे घोटाळे हेत असतात. सर्व पैलू एकाच माणसात नसतात असला तर तो अपवाद असतो. असेही यावेळी प्रकाश पाठक यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मुलांवर दबाव टाकू नका
पालकांनी आपल्या मुलांवर दबाव न टाकता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार अभ्यास करु द्यावा. आई-वडिलांनी आपल्या मुलां-मुलींसोबत मित्रासारखे राहावे. त्यांच्या अभ्यासकडे लक्ष द्यावे, असे यावेळी विनिता कावडिया यांनी सांगितले. त्यानंतर सचिव मनोजकुमार कावडिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य फिरोजा खान सुत्रसंचालन एकनाथ पाटील, मेघा रेंगे, तर आभार प्रदर्शन सुजाता देसले यांनी केले. यावेळी संदीप शिंदे, राजेंद्र पटेल, संजय पाटील, विनोद बुळे, पी.एल.पाटील, किरण पाटील, अरूण माळी यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.