अकुलखेडा-चुंचाळे गटात अपक्ष नितीन पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली

0

चोपडा । अकुलखेडा-चुंचाळे गटासाठी सर्वसाधारण जागेवर अपक्ष म्हणून नितीन जगन्नाथ पाटील निवडणूक लढवित आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी हे काँग्रेस आय, भाजपा व शिवसेनेच्या मातब्बर उमेदवारांच्या विरोधात उभे असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय नारायण महाजन चुंचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील अकुलखेडा, मौजे हिंगोणा, मजरे हिंगोणा, काजीपूरा, हातेड बुद्रुक गलवाडे, हातेड खुर्द, मार्डू, तापसे घु, दुखणखेडा, धुमावल बुद्रुक, चुंचाळे, कुंजीणे, मामाठदे, अंबाडे, नारोद, खरद, नरवाडे, विष्णापूर, पडती, बोरखेडा, आडगाव या गावांमध्ये प्रचाराचा आघाडी घेतली असून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे संजय महाजन यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

गटात करणार चौफेर विकास
जि.प.च्या माध्यमातून विकास कामांची माहिती देत गोरगरिबांच्या व कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी महोशय मेहनत घेणार असून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी गटात चौफेर विकास करण्यासाठी अपक्ष म्हणून नितीन पाटील निवडणूक लढवित आहे. गटात जलयुक्त शिवार

राबविणे, कोल्हापूर पॅटर्न बांधारे बांधणे, पाणी आडवा पाणी जीरवा, गटातील गावे हागणदारी मुक्त करणे, उन्हाळ्यात जि.प.निधीतून पाणी टंचाईवर अधिक भर देणे, नविन बोरवेल करणे, रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सिंचन या सर्व बाबींकडे विशेष लक्ष केंद्रीत करुन विविध समस्या सोडविण्यास सदैव तत्पर राहिल, अशी ग्वाही नितीन पाटील यांनी दिली.