अकोला । येथील जिल्हा रूग्णालयात विविध सुविधा योग्य रित्या मिळत नाही तसेच अतिदक्षता विभागातही अस्वच्छता होत असून या असुविधेमुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे काही संघटनेच्या तरूणांनी आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आणून दिल्यांनतर आमदार कडू यांनी रविवारी अचानकपणे जिल्हा सामान्य रूग्णालयात पाहणी केली. त्याठिकाणी परीस्थितीची माहिती घेवून जिल्हा रूग्णालयाचे प्रमुख यांना चांगलेच धारेवर धरले. कर्मचार्यामध्ये खळबळ उडाली होती.
आमदार येणार असल्याने रूग्णालयाची सफाई
राज्य शासन रूग्णाकरीता जिल्हा रूग्णालयात करोडो रूपये खर्च करते, तरीही मात्र दाखल झालेल्या रूग्णांचा योग्य रित्यासुविधा मिळत नसल्याची माहिती शहरातील काही संघटनांकडून रूग्णालयाच्या डिन यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देवून या सुविधा मिळवून द्यावी अश्या मागणी करण्यात आली होती. मात्र दिलेल्या निवेदनाचा त्यांच्यावर काहीही फरक पडला नसल्याचे लक्षात आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याच पडताळणी म्हणून रविवारी आमदार बच्चू कडू शासकीय रुग्णालयात येणार ही माहिती रुग्णालयाला कळताच सुट्टी असुनही रुग्णालयाने सर्व वॉर्डांची साफसफाई केली. बच्चू कडूंनी रुग्णालयाची पाहणी केली. आयसीयू वॉर्डात पाहणी केली असता तेथे पंखे, साफसफाई नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आयसीयूतील शौचालयाच्या दरवाजाला कुलूप असल्याचे पाहून बच्चू कडूंचा पारा चढला. त्यांनी रुग्णालयाचे डीन राजेश यांना धारेवर धरले. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. तर, रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावण होते.