अकोला: अकोला येथून भाजपकडून चौथ्यांदा विजयी झालेले खासदार संजय धोत्रे यांना मंत्रीपद निश्चित झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संजय धोत्रे यांना फोन केला असून त्यांना शपथविधीसाठी निमंत्रित केले आहे.
मला अमित शहा यांनी फोन करून मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे असे म्हटले, हा माझ्यासाठी हा सुखद धक्का होता असे त्यांनी सांगितले. कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात अनुभव असल्याने या खात्याची जबाबदारी मिळाल्यास अधिक आनंद होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.