अक्कलकुवा पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी

0

अक्कलकुवा। रमजान निमित्ताने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावित होते.

हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा राखण्यासाठी हिंदू व मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार नितीन देवरे , आमश्या पाडवी, विश्वास मराठे, मुतवल्ली झहीर अन्सारी,अब्दुल लतीफ अन्सारी, केसरसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, छोटू हाश्मी, बापू महिरे, विजय सोनार, मुन्ना मकरांनी, मुसा मकरांनी, दादमोहंमंद मकरांनी, मकसूद मकरांनी, लक्ष्मण वाडीले,देवचंद अहिरे, रवींद्र चौधरी, भिकमचंद चव्हाण, वेस्ता पाडवी,कृष्णा साळवे,नरेश जैन आदींसह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलिक निरिक्षक गणेश न्हायदे यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी शशिकांत नाईक, सुनील पाडवी जोहरी आदींनी परिश्रम घेतले.