अक्कलकुवा येथील उर्दू हायस्कूल येथे स्वांतत्र्यदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

0

अक्कलकुवा। येथील मौलाना अबुल कलाम आजाद रेसि उर्दु हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे स्वांतत्र दिनानिमित्त देशाच्या स्वांतत्र लढ्यात स्वातंत्र सैनिकांचा सहभाग व कार्य या विषयावर वकृत्त्व स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेंत एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मौलाना अ क आजाद उर्दु शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रफिक जहागीरदार तर प्रमुख पाहुण म्हणून अली अल्लाना इंग्रजी शाळा मुख्याध्यापक रियासत अली, व जामिया शाळा मुख्याध्यापक जावेद फारूकी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी व्हा
प्राचार्य रफीक जहागीर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबत इतर स्पर्धेंत ही सहभाग नोंदवावा कारण स्पर्धेतील सहभाग व उत्साह आपल्या आतील सुप्त गुणांना बाव देता व आपला सर्वात्मक विकास करण्यास मदत करतो. स्पर्धेंत इयत्ता 9वीची विद्यार्थींनी मक्राणी माहेनुर फिरोज ही प्रथम आली. द्वितीयस्थान इ. 7 वीच्या विद्यार्थींनी अफीफा अब्दुर्रहमान पटकविले तर इ. 5 वी या विद्यार्थींनी आलीया इतियास पांचभाया ही तिसर्‍यास्थानी आली.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार
स्पर्धेंत उत्तेजनार्थ बक्षिस सय्यद नौवफल नूर इ. 6वीच्या विद्यार्थ्यांला देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे मार्फेत घेण्यात आलेल्या इ. 5 वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील एकूण 11 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरल्याने त्यांचाही गौरव यावेळी त्यांनाही बक्षिस देवून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी उर्त्स्फुतपणे वकृत्त्व स्पर्धेंत भाग घेतल्याने शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.

यांनी पाहिले कामकाज
स्वांतत्र सैनिकांच्या विविध पैलुंचा यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला. या वकृत्त्वस्पर्धेत एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील विजेत्यांसोबत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले होते. सूत्रसंचालन रियाज तेली यांनी केले. यशस्वीतेसाठी जहुर शेख, फहेमिदा शेख, यास्मीन अंसारी, शेख अलताफ, युसूफ पिंजारी आदींनी कामकाज पाहिले. आभार उपप्राचार्य इमरान शेख यांनी मानले.