अक्कलकुवा येथे आदिवासी गौरवदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

अक्कलकुवा । आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचा प्रत्येकाला गर्व असला पाहिजे, प्रत्येकाला आपली संस्कृती जपण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावे लागणार आहे. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असली तरी समाजात प्रत्येक व्यक्तीचे स्थान महत्वाचे असते. मात्र समाजातील विद्यार्थी शिकले तर कुटूंब पुढे येते. असे आदिवासी गौरव दिनानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जर्मनसिंग वळवी यांनी सांगितले.

कार्यक्रमास समाजबांधवांची उपस्थिती
अक्कलकुवा याठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जर्मनसिंग वळवी होते. याप्रसंगी आदिवासी महासंघाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष आमश्या पाडवी, काठी चिप्टन संस्थानीक पृथ्वीसिंग पाडवी, महिला बालकल्याण सभापती लता दौलतसिंग पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सुनिता वसावे, संध्या पाटील, सुरेश वसावा, पंचायत समिती सदस्य मिना पाडवी, रायसिंग वसावे, आदिवासी महासंघाचे किसन महाराज, आदिवासी महासंघाचे कार्याध्यक्ष हिरामन पाडवी, आदिवासी महासंघाचे अक्कलकुवा शहराध्यक्ष राजेंद्र पाडवी, रिना पाडवी, आदिवासी महासंघाचे तालुका सरचिटणीस गिरधर पाडवी, सरपंच विनोद वळवी, धनसिंग वसावे, चंदुलाल तडवी, सरपंच अशोक पाडवी, आदिवासी विद्यार्थी महासंघाचे तालुका अध्यक्ष तुषार पाडवी, सतवन पाडवी, जोलु वळवी, अ‍ॅड. एल. एम. पाडवी, जवराबाई पाडवी, रेखाबाई पाडवी, ईश्वर तडवी, नानसिंग तडवी, लक्ष्मण वाडीले आदि उपस्थित होते.

श्री देवमोगरा मातेसह धरतीमातेचे पुजन
सकाळी श्री महाकाली माता मंदिराच्या आवारात वृक्ष पुजा, धरतीमातेचे पुजन, शस्त्र पुजा करून प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर तहसीलदार कार्यालयाचे धान्य गोदामात आदिवासी कुलस्वामिणी आई श्री देवमोगरा मातेचे पुजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष जर्मनसिंग वळवी यांनी सांगितले की समाजातील सुशिक्षित विद्यार्थ्यांनी शिक्षणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून इतरांना देखील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. याप्रसंगी आदिवासी महासंघाचे तालुका सरचिटणीस गिरधर पाडवी यांनी प्रस्तावना केले. तर तापसिंग वसावे, तुकाराम वळवी, नरसी पाडवी, विक्रम वळवी, तापसिंग वळवी, दिलीप वसावे, रायसिंग वळवी, दिनेश वसावे, वसंत वसावे, मोहन वसावे, जयप्रकाश परदेशी, नंदलाल चौधरी, किशोर ठाकूर, संतोष पवार, रोहित चौधरी, सचेंद्रसिंग चंदेल, जिग्नेस सोनार, आसिफ मक्राणी, शाकिब पठाण, दिपक पाडवी, अब्दुल मक्राणी, नासिर बलोच, विपुल शिंपी, इमरान मक्राणी, राजु पाटिल, युवराज तडवी, हरुण कुरेशी यांनी परीश्रम घेतले.

मुस्लीमबांधवांद्वारे रॅलीचा सत्कार
यावेळी आदिवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी आमश्या पाडवी यांची निवड करण्यात आली. तर आदिवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हा युवाध्यक्षपदी किशन महाराज यांची निवड करण्यात आली. शहरातील हनुमान मंदिर याठिकाणी लायन्स क्लब अक्कलकुवा यांच्या वतीने रॅलीचा सत्कार करण्यात आला. तर पंचायत समिती उपसभापती इंद्रपालसिंह राणा, विरबहाद्दुरसिंह राणा यांनी, देवचंद अहिरे, हिम्मत अहिरे, राजेंद्र डागा, मनोज डागा, संदिप मराठे, तसेच तळोदा नाका याठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिकरित्या रॅलीचे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत आदिवासी महासंघाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष आमश्या पाडवी यांनी नेतृत्व केले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.