अक्कलकुवा। सध्या देशात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी सुरु आहे. शाळा बंद असल्या तरीही अनेक विद्यार्थ्यांना आहाराची सोय उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या आदेशानुसार अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शालेय पोषण आहार शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला.
शालेय पोषण आहार वाटपावेळी अक्कलकुवा ग्रा.पं.चे सरपंच राजेश्वरी वळवी, शाळेचे मुख्याध्यापक एच.के. चव्हाण, पालकवर्ग, जेष्ठ शिक्षक आर.एच.महिरराव,एम.एन.इंगळे, के.आर. वळवी, एम.जी.मगरे, अरुण मोरे, व्ही.एस. साळवे व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कोणत्याही नियमाचे उल्लंघन न करता दोन मीटर अंतराचे सोशल डिस्टन्स ठेवून नियमबध्द पध्दतीने शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले.