अक्कलकुव्याचा लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात

0

वाहन चालकाकडून स्वीकारली 800 रुपयांची लाच ; नंदुरबार एसीबीची कारवाई

नंदुरबार- प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकाकडून 800 रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकुवा पोलिस ठाण्याचा हवालदार रवींद्र सनसिंग ठाकरे (44) यास नंदुरबार एसीबीने गुरुवारी सायंकाळी अक्कलकुवा येथे अटक केली. पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे व सहकार्‍यांनी सापळा यशस्वी केला.