खापर ( प्रतिनिधी ) अक्कलकुवा शहरात परराज्यातुन आलेल्या व्यक्तींनी खोटी कागदपत्रे सादर करून शहराचे नागरिकत्व मिळविले आहे. अशा नागरिकांची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अक्कलकुवा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल व सातपूड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेला तालुका आहे .अक्कलकुवा शहरात परराज्यातून आलेल्या असंख्य लोकांनी खोटी कागदपत्रे सादर करून शहरातील नागरीकत्व मिळवून घेतले आहे. अशा लोकांकडून अक्कलकुवा शहराची शांतता भंग होत असते. त्यातून जातीय तेढ देखील निर्माण होत आहे. शहरातील ग्रुप ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय ,आधार कार्ड केंद्र या ठिकाणी खोटे कागदपत्र सादर करून किंवा खोटी माहिती देऊन अक्कलकुवा शहराचे कायमचे रहिवासी होतात. त्यामुळे अक्कलकुवा शहराची प्रस्थापित शांतता भंग होत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणाची त्वरित चौकशी होऊन अशा नागरिकांचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथ माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना लेखी निवेदनातून केली आहे.