मुंबई – मालाड येथील चारकोप यथील अथर्व महाविद्यालयात येत्या शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत अक्टिंगच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात मांझी चित्रपटात झळकलेली उर्मिला महानता प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्वांनाच विशेष करून मुलीना अक्टिंगचे धडे देणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त तरुण तरुणींनी उपस्थित राहून अक्टिंग चे धडे घेण्याचे आवाहन कार्यशाळेच्या आयोजिका अश्विनी यांनी केले आहे.