कोलंबो । श्रीलंकेविरुद्ध 12 ऑगस्टपासून सुरू होणार्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी फिरकी गोलंदाज अक्शर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. नियमाचे उल्लंघन केल्यामुळे एक सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आलेल्या रवींद्र जडेजाच्या जागी पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिरकी गोलंदाजांची संघातील जागा कुलदीप यादव मिळणार का अक्शर पटेलला याची सगळ्यांना उत्सुकता आहे. पल्लेकलमधील सामन्यासाठी पटेलचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यास त्याचा तो पहिला कसोटी सामना असेल.
जडेजाऐवजी पटेल
बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले की, भारताच्या वरिष्ठ संघ निवड समितीने 12 ऑगस्टपासून सुरू होणार्य तिसर्या कसोटी सामन्यासाठी रविंद्र जडेजाच्या जागेवर अक्शर पटेलची संघात निवड केली आहे.
अक्शर सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे.
भारत अ संघातून खेळताना त्याने दक्षिण आफ्रिका अ संघावर मिळवलेल्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या विजयामुळे भारताने तिंरगी मालिका जिंकली. 24 महिन्यांच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जडेजाचे सहा गुण वजा करण्यात आले होते. त्यासाठी त्याच्यावर एक सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली.