अक्षयच्या नावाचा मेसेज बनावट!

0

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराला अधिक मजबूत करण्यासाठी आणि शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी एक बँक खाते उघडले आहे. या खात्यात तुम्ही स्वत:च्या मर्जीने मदत करू शकता, असा एक मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला आहे. केंद्राचे हे पाऊल कसे महत्त्वपूर्ण आहे, हे देखील मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. तुम्हालाही असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर आला असेल तर थांबा. कारण हा मेसेज बनावट आहे.

सैनिकांसाठी भावनिक आवाहन
या मेसेजमध्ये म्हटले आहे की, भारतातील 130 कोटी जनतेपैकी जर 70 टक्के जनतेने केवळ 1 रुपया सरकारच्या खात्यात जमा केला तर एक दिवसात 100 कोटी रुपये जमतील. 30 दिवसांत 3 हजार कोटी रुपये जमतील आणि वर्षाला 36 हजार कोटी रुपये जमतील. 36 हजार कोटी रुपये तर पाकिस्तान प्रत्येक वर्षाला संरक्षण खात्यावर खर्च करते. आपण प्रत्येक जण दररोज खाण्यापिण्यावर 100 ते 1 हजार रुपये खर्च करत असतो.