अक्षयच्या पदरात फॉक्स स्टार स्टुडिओचे तीन चित्रपट

0

मुंबई : अक्षय कुमारला फॉक्स स्टार स्टुडिओचे तीन चित्रपट मिळाले आहेत. यातील पहिला चित्रपट ‘मिशन मंगल’ असून या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण नोव्हेंबरच्या पुढील आठड्यापासून सुरु होणार आहे.

आर. बाल्की आणि जगन शक्ती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटामध्ये अक्षय मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याने त्याच्या टीमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा या दिसून येत आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षात अक्षयने अॅक्शनपटाऐवजी सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांना पसंती दिल्याचं पाहायला मिळत होते. चित्रपटातून केवळ मनोरंजन न करता त्यातून समाजाला सामाजिक संदेश देता यावाकडे अक्षयचा कल असल्याचं यातून एकंदरीत दिसून येत आहे.