कल्याण : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. भारतीय सणांचे वैशिष्टय़ असे आहेकी, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे, अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असाआहे. म्हणूनच की काय? या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास उत्तरोत्तर प्रगती होते, असे मानल्याने यादिवशी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. यामुळे या दिवशी दागिने खरेदीचा मुहूर्त साधला जातो.यामध्ये सोने-चांदी खरेदीला महत्त्व असते. सोन्याचे बहुढंगी दागिने, बिस्किटे, रिंग अशा स्वरुपात खरेदी केली जाणार असल्याचे सोनारांचे म्हणणे आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवरदेखील वधू-वरांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधला जातो. सोन्याची खरेदी करून गुंतवणूक करण्याचा शुभ मुहूर्तच मानला जातो.
या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही केली जाते. त्यातच उन्हाळा असल्याने फ्रीज, एसी, कुलर, फॅन अशा थंडावादेणाऱया इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच लॅपटॉप, संगणक, टीव्ही, एलसीडी, मोबाईल यांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. तर जास्तीजास्त लोकांनी खरेदी करावी यासाठी अनेक ऑफर्स देण्यात आली आहे. तर वाहन आणि घर खरेदी मध्ये मोठया प्रमाणावर ऑफर्स दिल्या जात आहे. विशेष करून तरुण वर्ग दुचाकी, चार चाकी वाहन खरेदीसाठी सदर मुहूर्ताची वाट पाहतो. यामुळे वाहन खरेदीचे बुकींगमहिन्याआधीच करण्यात आले आहे. कपडे खरेदी करण्याकडेदेखील नागरिकांचा ओढा असतो. यामध्ये लग्नसराईचीधामधूम असल्याने ‘लग्नाचा जथ्था (बस्ता)’ काढण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी वाढते. यामुळे वस्त्रदालने खरेदीदारांसाठीसज्ज झाली आहेत. याशिवाय या दिवशी आंब्याचा नैवेदय दाखविला जातो. त्यातच यंदा आंब्याचे उत्पादन मोठया प्रमाणावर झाल्याने यंदा आंबा तसा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. मात्र अक्षयतृतियेला हा फळांचा राजा भाव खाणारच असेही आंबे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.