अक्षयने केला ‘गोल्ड’चा व्हिडीओ शेअर

0

मुंबई – १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘हॉकी’ या खेळावर आधारित ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ‘हॉकी’ या क्रीडा प्रकारात मिळालेल्या पहिल्या ‘गोल्ड मेडल’ची कथा दाखवली गेली आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या ३ दिवस आधी अक्षयने एक खास व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत अनेक दिग्गज खेळाडू दिसत आहेत. हे सर्व खेळाडू आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळाल्यानंतरच्या त्यांच्या भावना व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहेत. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि पहिल्या गोल्ड मेडलचा इतिहास रचणाऱ्याच्या तोंडून त्यांच्या यावेळच्या भावना जाणू घेत हा उत्सव साजरा करा,हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने याला असे कॅप्शन दिले आहे.