मुंबई । लंडनमध्ये झालेली आईसीसी महिला विश्वकप स्पर्धेच्या फायनलमध्ये जास्त धावा घेऊन प्रसिद्ध झालेली पूनम राऊत हिने स्पर्धेत हरल्यामुळे आम्ही अक्षय कुमार सोबत आनंद व्यक्त करु शकलो नसल्याची खंत व्यक्त केली. भारतीय महिला क्रिकेटरनां प्रोत्साहित करण्यासाठी आणि फायनल पाहण्यासाठी अक्षय कुमार स्टेडियमवर आला होता.
पूनमने सांगितले की, आम्ही सर्वच महिला क्रिकेटर अक्षय कुमारच्या फँन आहोत. मात्र फायनलमध्ये आमचा झालेला पराभव पाहता आम्हाला अक्षय कुमारला भेटणे थोडे संकुचित वाटले. स्पर्धेच्या फायनलमध्ये आम्ही जिंकलो असतो तर आम्हाला अक्षय कुमारसोबत हे यश साजरे करणे खूपच आवडले असते. मात्र स्पर्धेत झालेला पराभव पाहता आम्ही त्यावेळी खूपच उदास होतो.
तरीही अक्षय भेटलाच…
आम्ही अक्षय कुमारसोबत यश साजरा करण्याचा तो क्षण गमावून बसलो असल्याने याचे आम्हाला खूपच वाईट वाटत आहे. फायनलच्या दरम्यान लीड्स येथील शूटिंग सोडून अक्षय कुमार हा भारतीय महिला क्रिकेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर आला होता. मात्र, भारताचा पराभव झाला असला तरी मोठ्या मनाच्या अक्षय कुमारने भारतीय महिला क्रिकेटर्सची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.