अक्षय-सलमानसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या !

0

नवी दिल्ली: सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिनेता कुशल पंजाबी (३७) असे त्याचे नाव आहे.त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपास करत आहे. कुशल पंजाबीने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘लव मैरिज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ‘ईश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

कुशलने देखील सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’, अजय देवगणसोबत ‘काल’ आणि सलमान सोबत ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘दन दना दन गोल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुलशने यूरोपियन मुलीशी लग्न केले होते. २०१६ मध्ये त्याला एक मुलगा झाला. कुशलने त्याच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.