अक्षरा हसन फोटो लीक प्रकरणात तनुजवर संशय

0

मुंबई : कमल हसनची मुलगी अक्षरा हसनने अमिताभ बच्चन आणि धनुष यांच्या ‘शमिताभ’ या चित्रपटात काम करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अक्षरा हसनचे काही खासगी फोटो काही दिवसांपूर्वी लीक झाले होते. लीक झालेल्या फोटोत अक्षरा अंडरगारमेंट्समध्ये सेल्फी काढताना दिसत होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुजने हे फोटो व्हायरल केल्याचे म्हटले जात आहे.

अक्षराने २०१३ मध्ये आपल्या आयफोन ६द्वारे हे फोटो घेतले होते. यावेळी अक्षरा तनुजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने तिने हे फोटो तनुजसोबत शेअर केले होते. यानंतर २०१६ मध्ये या दोघांचेही ब्रेकअप झाले. त्यामुळे, या प्रकरणात लवकरच तनुजची चौकशी होऊ शकते. मात्र, एका माध्यमाशी बोलताना माझ्याकडे अक्षराचे कोणतेही फोटो नसल्याचे तनुजने स्पष्ट केले आहे.