अक्षर पटेल भारतीय संघात परतला

0

नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. शेवटच्या दोन सामन्यांसाठी अक्षऱ पटेलचा संघात समावेश करण्यात आलाय, तर रवींद्र जडेजा या दोन सामन्यांत खेळणार नाही. अखेरच्या दोन सामन्यांसाठी अक्षऱ पटेल वगळता संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चेन्नईतील सामन्यात अक्षर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी जडेजाला संधी देण्यात आली होती. मात्र, आता अक्षऱला पुन्हा संघात स्थान देण्यात आलेय, तर जडेजा संघाबाहेर गेलाय.

दरम्यान, सलामीवीर शिखर धवनही पुढचे दोन सामने खेळणार नाहीये. मालिकेतील दोन सामने 28 सप्टेंबरला बंगळूरु आणि 1 ऑक्टोबरला नागपूरमध्ये खेळवले जाणार आहेत. सलग तीन सामने जिंकल्यानंतर निवड समितीने रविवारीच पुढच्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला. निवड समितीने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजाला विश्रांती दिली होती. त्यांच्या जागी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना समाविष्ट करण्यात आले होते. पहिल्या तीन सामन्यांत चहल आणि कुलदीप यांनी चांगल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, एम एस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शामी, अक्षर पटेल.