अक्सा नगरात घडले जातीय सलोख्याचे दर्शन

0

वरणगाव। येथील अक्सा नगरातील सरकारवाले गृपच्या माध्यमातून ईद मिलनाच्या कार्यक्रमातून हिंदू मुस्लीम सर्वधर्म समभाव या संकल्पनेतून मुस्लीम बांधवांनी शिरखुरमा वाटप करुन सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. सरकारवाले गृपच्या माध्यमातून जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात शहरातील सर्वधर्मियांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, उपपोलिस निरीक्षक प्रविण ठुबे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपनगराध्यक्ष शेख अरवलाक, डॉ बापू जंगले, डॉ अनंत फेगडे, डॉ पिंपळे, नगरसेवक सुधाकर जावळे, सुनिल काळे, राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, रविंद्र सोनवणे, गणेश धनगर, संतोष माळी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
देशातील तरुण पिढीच सामाजिक ऐक्याचे काम अधिक प्रभावीपणे करेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी गृपचे अध्यक्ष असलम अंबला, उपाध्यक्ष इस्माईल बेग, शाहीर मिर्जा, शेख गफ्फार, जावीद खान, अब्दूल हुसेन, जुनेद शहा, रहिमशहा, शेख शोयब, शेख फैसल, रईस बागवान, इजास खान, अशफाश शहा आदींनी परिश्रम घेतले.