अखिलेश कटीयार यांनी केली शिरपूर येथील कामांची पाहणी

0

शिरपूर। जे.डी.यू. (जनता दल युनायटेड) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अखिलेश कटारीया यांनी शिरपूर पॅटर्न तसेच विविध विकासकामांची पाहणी करुन आमदार अमरिशभाई पटेल यांची प्रशंसा केली. तसेच कामांची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले.जे.डी.यू. (जनता दल युनायटेड) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तसेच पाटीदार समाजाचे महासचिव अखिलेश कटारीया यांनी एन.एम.आय.एम.एस. ट्रस्टी चिंतनभाई पटेल यांच्या समवेत विविध विकासकामांची नुकतीच पाहणी केली.

भूजलतज्ञ खानापूरकर यांच्याशी चर्चा
चिंतनभाई पटेल यांनी सर्व विकासकामांबद्दल माहिती दिली. अखिलेश कटारीया यांनी शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाची कामे त्यानंतर टेक्सटाईल पार्क, मुकेशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल तसेच विविध प्रकल्पांची पाहणी केली. या सर्व कामांची गुणवत्ता व कामाची पद्धत पाहून ते थक्क् झाले. शिरपूर पॅटर्नच्या कामांबाबत वरीष्ठ भूजलतज्ञ सुरेश खानापूरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दुपारपर्यंत या सर्व कामांना भेट देत असतांनाच जे.डी.यू. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा आदेश आल्याने त्यांना मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अचानक रवाना व्हावे लागले.