रावेर:- ऑल इंडिया काँग्रेस कमेटीच्या सदस्यपदी (एआयसीसी) वर माजी आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली. याबाबतची माहिती नुकतीच नवी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयातून प्राप्त झाल्याने समर्थकांनी आनंद व्यक्त केला. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता शुक्रवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी अनेक फेर-बदल करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शिफारशीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सदस्यपदी माजी आमदार चौधरी यांची निवड केली. यावेळी महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त वसंतराव पाटील, प्रकाश आर.पाटील (पी.आर.पाटील), प्रभात चौधरी, प्रा.व्ही.आर.पाटील, अजीत पाटील आदींनी शिरीष चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.
पक्षाचा विचार जनतेत पोहचविणार -शिरीष चौधरी
राष्ट्रीय पक्षश्रेष्ठीने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळून काँग्रेस पक्षाचा विचार जनतेत पोहचविणार असून आगामी येणार्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा येतील, असा विश्वास माजी आमदार शिरीष चौधरी यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केला.