अमळनेर । अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अमळनेरची मासिक बैठक अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा प्रमुख विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडली. या बैठकीत ग्राहकांच्या हिताबाबत अनेक अडचणी समजून घेऊन संबंधित कार्यालयाशी सामोपचाराने ग्राहकांच्या असलेल्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत 24 डिसेंबर हा दिवस शासन फक्त फोटोसेशन करण्याकरिता साजरा करते हे धोरण बदलवण्या बाबतही कार्यकारिणी सदस्यांनी मांडले. हा दिवस खरोखर ग्राहक हितासाठी त्याला त्याचे हक्क जाणून घेण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या समस्या ह्या अधिकार्यांसमोर स्पष्टपणे मांडून त्यांचे निरसन त्याचदिवशी व्हावे. संबंधित अधिकार्यांनी आपल्या कार्यकक्षेत येणारे ग्राहकांचा प्रश्नांना बाबत संपूर्ण अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावे असे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले.
विविध मागण्यासाठी खासदार पाटील यांना निवेदन
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहकांच्या सेवेसाठी आहे त्यांचे प्रश्न हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोडवणारच असा सूर या बैठकीत होता. कार्यकारणीतील सदस्यांनी आपण ग्राहकांच्या हिताबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत असे विकास महाजन यांना ग्वाही दिली. यावेळी जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्यांची निवड झालेले सदस्य विजय पारख, मकसूत बोहरी, नरेंद्र पाटील यांचा सत्कार झाला. तसेच बैठकीतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक प्रकाश ताडे, राजेंद्र खाडिलकर व संघ परिवाराचे कार्यकर्ते यांचाही सत्कार करण्यात आला. सदर बैठकीत ब्लॅक ऑऊट डे संदर्भात मुंबई जाण्यासाठी रात्रीची बससेवा एस.टी.महामंडळाने सुरू करावी तसेच अनेक ग्राहक हिता बाबतचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले तर आभार विजय शुक्ल यांनी मानले. यावेळी बैठकीला तालुकाध्यक्ष मकसूद बोहरी, सचिव विजय शुक्ल, कोषाध्यक्ष जयंतीलाल वानखेडे, राजेंद्र सुतार, योगेश पाने, बापू चौधरी आदी उपस्थित होते.