जळगाव – अखिल भारतीय जर्नालिस्ट या फेडरेशनच्या राज्य प्रवक्तापदी जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद एडके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी पाठवलेले त्या संदर्भाचे पत्र एडके यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
जळगावच्या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मुकुंद एडके यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांचा अनुभव, केलेले कार्य आणि ज्येष्ठता यांचा विचार करून ही सन्माननीय नियुक्ती करण्यात आलेली आहे. एडके यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशन संघटनेच्या जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकारिणी व पदाधिकारी यांची देखील नियुक्त करावयाची आहे. याबाबत जिल्ह्यातील इच्छुक पत्रकारांनी 9922924607 या नंबरवर मुकुंद एडके यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.