चोपडा : अखिल भारतीय पालिवाल समाजाच्या कुंभमेळाव्याचे आयोजन 2017 मध्ये एप्रिल महिन्यात समाजाची कुलदेवी असलेल्या माँ आशापुर्णा धाम देवगुराडीया ता.सोयतकला जि. आगर मध्यप्रदेशात होणार आहे. देशातीलच नव्हे तर देश विदेशातील पालिवाल(महाजन)समाज बांधव या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. पालिवाल महाकुंभ 2017 ची माहिती देण्यासाठी आज चोपडा येथील गायत्री मंदिरात बैठक झाली. या बैठकीत सोयतकला (मध्यप्रदेश) येथील महाकुंभ आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी झाडोत (पालिवाल) यांचे सह महाकुंभ जनसंपर्क समितीचे सदस्य उपस्थित होते. चोपडा पालिवाल समाजच्या अंतर्गत आयोजित केलेल्या या बैठकीत राजेंद्र झाडोत यांनी पालिवाल महाकुंभ मेळाव्याची संकल्पना आणि रुपरेषेची माहिती दिली.
समाज बांधव देश विदेशातून आवर्जून हजेरी
दर 12 वर्षांनी होणार्या या मेळाव्यासाठी पालिवाल (महाजन) समाज बांधव देश विदेशातून आवर्जून हजेरी लावत असतात. जगाच्या पाठीवर एखाद्या समाजाचा अश्याप्रकारे होणार हा एकमेव कुंभमेळा असून यात समाजातील प्रत्येक वर्गातील समाज बांधवांना भेटण्याची संधी मिळत असते. देवगुराडीया (म.प्र.) येथील आशापूर्ण माता कुलदेवी असलेल्या पालिवाल (महाजन) समाजाचे कुंभ मेळाव्याचे आयोजन 12 वर्षातून एकदा केले जाते. या सहा दिवसीय महाकुंभ मध्ये समाजातील अनेक पैलूंवर चर्चा होत असते. अत्यल्प संख्यांक असलेल्या पालिवाल (महाजन) समाजातील उच्च विद्या विभूषित तसेच उच्च पदस्थ गुणवंतांचा सत्कार हि यात केला जात असतो. समाजातील श्रद्धा अंध श्रद्धा प्रथा कुप्रथा या सारख्या विषयांवर विचार मंथन होत असते. आगामी एप्रिल महिन्यात होत असलेल्या पालिवाल महाकुंभ 2017 चे आयोजन हे माँ आशापूर्णा धाम परिसरातील 100 एकर जागेवर करण्यात येणार आहे या विशाल आयोजनासाठी परिसरात सुमारे 500 टेन्ट लावून निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालिवाल महाकुंभ 2017 च्या सफल नियोजन साठी वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले गेले असून चोपडा पालिवाल समाजास महाराष्ट्रत राहणार्या समाज बांधवांची जवाबदारी सोपविण्यात आली आहे त्याच प्रमाणे सूचना प्रसारण आणि सोशल मीडिया ची जवाबदारी चोपडा पालिवाल समाज कडे देण्यात आली असून चोपड्यात पालिवाल महाकुंभ2017 साठी महाराष्ट्र संपर्क कार्यालय उघण्यात येत असल्याचे हि श्री.झाडोत यांनी सांगितले.
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्यात चर्चासत्र, वधू-वर मेळावा, गुणवंतांचा सत्कार, सामूहिक विवाह, समाजातील महिलांनी बनवलेल्या कला कृतींचे प्रदर्श, पाककला स्पर्धांसह रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत चोपडा पालिवाल समाज बांधवांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात माँ आशापूर्णा वंदन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. बैठकीचे प्रस्थाविक कांतीलाल पालिवाल यांनी केले तर पालिवाल उन्नती मंडळाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शैलेश पालिवाल, अभिषेक पालीवल, सिद्धार्थ पालिवाल मोनेश पालिवाल, निलेश पालिवाल, महेश पालिवाल, सौमित पालिवाल, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निल पालिवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन चोपडा पालिवाल समाजाचे अध्यक्ष अजय पालिवाल यांनी केले.