अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या जिल्हाध्यक्षपदी चाळीसगावचे सतीश महाजन

0

चाळीसगाव- तालुक्यातील देवळी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे विद्यमान सरचिटणीस सतीश महाजन यांची नुकतीच जळगाव जिल्हा समता परीषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान करून करण्यात आली. सतीश महाजन हे गेल्या 20 वर्षांपासून समता सैनिक म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी सहकारी संघाचे ते विद्यमान संचालक आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे तालुका संघटक असलेले महाजन हे जिल्ह्यात कट्टर भुजबळ समर्थक ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे समता परीषदेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले आह. त्यांच्या धर्मपत्नी कविता महाजन ह्या देखील टाकळी ग्रामपचायती च्या सदस्य आहेत तसेच चाळीसगांव तालुका विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षा आहेत.