अखिल भारतीय मानवाधिकार संघटना विकासासाठी कार्यरत

0

अंबरनाथ । आपल्या देशात आजकाल जो तो पळतोय,कुठे पळतोय हे पळणार्‍याला माहीत नाही, पण पळत आहे हे चित्र काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत दिसत आहे पंतप्रधान खासदार,आमदार अधिकारी,राज्याचे मुख्यमंत्री, पळत आहे, त्यांना पळू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका,कारण की ही मंडळी मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पळत नाहीत. त्यामुळे लोकाकरीता, त्यांच्या गरजा करीता, त्यांना अधिकार मिळवून देण्याकरिता, मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून देशभरातून नेमून दिलेल्या पदाधिकारी,सदस्याच्या सहकार्याने पळत आहोत,आम्ही जात पात मानत नाही फक्त मानवाला मानवाधिकार मिळवून देण्याकरीता एक सामाजिक कार्य करत आहोत असे एम.यु.दुवा यांनी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या आहिरा उत्सवाच्या कार्यक्रमात सांगितले. या उत्सवाचे आयोजन ठाणे जिल्हाध्यक्ष अजयराव चिरीवेल्ला यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.यु. दुवा यांच्यासह सानिया दुवा, बलबीर बादशा, छावा संघटनेचे निखिल गोळेपाटील, उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, सलील जव्हेरी, सत्यम पुरी उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील नामांकितांचा गौरव
या वेळी अंबरनाथ शहरातील सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता, व्यापार, बँकिंग क्रीडा सांस्कृतिक औधोगिक, अन्य क्षेत्रातील नामांकित लोकांचा एम.यु.दुवा.यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्यात उद्योगपती दत्ता भोईर, व्यापारी खानजी धल, रूपसिंग धल, निखील गोळे, डॉ. उषा महेश्‍वरी, डॉ. मनोज कंदोई, पूनम शेलार, नवीमुंबई अध्यक्ष राजन, भिवडीचे दीप्ती देशमुख, नागलक्ष्मी नायडू, परवीन, रत्नागिरीचे कॅप्टन अनंत निकम, पत्रकारिता क्षेत्रातील कमर काजी, कमलाकर सूर्यवंशी, सीझर लॉरेन्स, तसेच शिफा क्लासेसचे डायरेक्टर नाझीम शेख व यास्मिन शेख, पीसी पोइटचे उमेश महाजन व प्रदीप कुमावत, नगरसेवक सुभाष साळुंखे, अंबरनाथ जय-हिंद बँकेचे संस्थापक संचालक विलास देसाई, बॉडी बिल्डर शैलेश साळुंखे, फातिमा शाळेचा आर्या गायकवाड, ईमेज ग्राफिक्सचे अजित सावंत व सचिन मोरे, ओम पंथोलोजीचेद डॉ,सुरेश पाटील, डान्सर रमेश कोळी, पोलीस नाईक नवनाथ लोकरे, गोपनीय विभागाचे गौतम सारुक्ते, समाजसेवक राजेश भावसार यांच्यासह सर्व मान्यवरांना पुरस्कार व सन्मानचिन्ह राष्ट्रीय अध्यक्ष एम. यु. दुआ यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.

त्याच प्रमाणे पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी,उस्मान शाह,शिकांत खाडे,नवाझ वणू,अशोक नाईक, पांडुरंग रानडे,युसूफ शेखयाना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन शेख यांनी मराठी व इंग्रजी भाषा शैलीत उत्तम प्रकारे केले, तर आभार प्रदर्शन रश्मी कुट्टी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अजयराव चिरीवेल्ला यांच्यासह शशिकला नायर,व्यंकटेशराव, अन्लेक्स, ब्रिजेश पांडे, निरंजन कारंजे, विजय उपाध्य, नवीन शेट्टी, चिराग संगोई, अजित रापडू, महावीर जैन, नाजीम शेख, श्रीकांत मंडलेकर, , पूनम जाधव, उषा भालेकर, रश्मी कुट्टी, यास्मिन शेख, निरजा आनंदकुमार, दर्शना चिरीवेल्ला, पल्लवी मयेकर, रागिणी बारस, प्रतीक्षा पंजाबी, जयश्री गुप्ता, रेश्मा जेठवा, बाळा नायडू, रोजा राव, शुभांगी बाउल, मंगला पांढरे, ज्योती पांडे आदींनी परिश्रम घेतले.