साक्री। पंचायत समिती साक्री (शिक्षण), साक्री तालुका मुख्याध्यापक संघ,साक्री तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2017 दहिवेल येथील कै.दे.सो.पाटील विद्यालयात संपन्न झाला. या अंतर्गत झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू. इंग्लिश स्कुल दिघावेच्या कु.दर्शना अशोक भामरे हिने प्रथम, दहिवेल च्या कु. नेहारीका सुनिल पाटील हिने द्वितीय तर उत्तेजनार्थ बक्षीस म्हसदी येथील सी.डी.देवरे विद्यालयाची कु.मानसी शरदचंद्र देवरे हिने मिळविले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दहिवेल एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन प्रभाकर बच्छाव होते.प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.जे.पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.डी. बच्छाव, बी. बी. दहिवेलकर, बी.डी.गांगुर्डे, एस. के. अहिरराव, पी.एम.कदम, केंद्रप्रमुख डी.बी.कुवर, जिल्हा विज्ञान संघाचे सहकार्यवाह के.एन.माळी, बी. बी. बिरारीस उपस्थित होते. यावेळी विज्ञान मंडळातर्फे घेण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती व मेळाव्याची कार्यप्रणाली विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर यांनी प्रास्ताविकेतून सांगीतले. मेळाव्यासाठी यावर्षी स्वच्छ भारत – विज्ञान व तंत्रज्ञानाची भुमिका असा विषय देण्यात आला होता. एकुण 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
विजेत्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्हे
बक्षीस वितरणप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.डी.बच्छाव, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर, उपाध्यक्ष डी.व्ही.सर्यवंशी, पर्यवेक्षक आर.वाय.बच्छाव, पी.एन.गांगुर्डे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्हे देण्यात आली. परीक्षक म्हणून प्रा.सचिन नांद्रे(दहिवेल), व्ही.जी.एखंडे(सामोडे) ,एस.डी.शेवाळे(पिंपळगांव) तर वेळ नियंत्रक म्हणून हरिष माळी व चेतन नांद्रे यांनी काम पाहीले. यशस्वीतेसाठी सहकार्यवाह ए.वाय.नांद्रे, व्ही.ए.सोनवणे, बी.बी.बिरारीस, ए.एस.पाटील, ए.जी.भदाणे, डी.एम.शिंदे, शिवाजी चौरे, पृथ्वीराज शिंदे, एच.आर.पाटील, जी.एल.कागणे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतरांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन बी.एस.सोनवणे व डी.एस.सोनवणे यांनी तर आभार विज्ञान मंडळाचे सचिव के.एस.बच्छाव यांनी मानले.