अखिल भारतीय शाहीर परिषदेचे आंदोलन

0

धुळे : अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या वतीने कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शाहीर, कलावंत, कवी, लेखक, वारकरी संप्रदाय, साहित्यिक, तमाशा कलावंत, लोक कलावंत, वाघ्या मुरळी, जोगनी व इतर सर्व कलावंतांच्या मानधन योजनेसंबंधी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हास्तरीय मानधन निवड समिती गठीत केली नाही. म्हणून दोन ते तीन वर्षांपासून अनेक प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. वृध्द कलावंतांना जिल्हा परिषदेमध्ये अनेक वेळा फेर्‍या मारुन सुध्दा मानधनाबाबत कोणतेही उत्तर मिळत नाही. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शाहीर गंभीर बोरसे, कार्याध्यक्ष अप्पा खताळे, मंडाबाई माळी, शाहीर श्रावण वाणी, शाहीर भटू गीरमकर सहभागी होणार आहेत.